राज्याच्या सत्तासंघर्षावरील निकाल सर्वोच्च न्यायालयाने ठेवला राखून

शुक्रवार, 17 फेब्रुवारी 2023 (08:15 IST)
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षांवर तिसऱ्या दिवशी सुनावणी पूर्ण झाली. यावेळी ५ सदस्यीय खंडपीठाने आपला निर्णय राखून ठेवला आहे. यावर आता निकाल कधी देणार? हे खडंपीठाने अद्याप स्पष्ट केलेले नाही. गेल्या ३ दिवसांपासून सत्तासंघर्षांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. अशामध्ये ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही पक्षांकडून विविध मुद्द्यांवर जोरदार युक्तीवाद पार पडला. या प्रकरणात विविध मुद्द्यांवर निकाल येणे अपेक्षित आहे. पण सध्या हे प्रकरण ७ सदस्यीय खंडपीठाकडे जाणार की नाही? यावरच युक्तीवाद पूर्ण झाला.
 
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतो की नाही, याच मुद्द्यावर हे प्रकरण ७ न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची उद्धव ठाकरे गटाच्या वकिलांनी मागणी केली. पुन्हा ५ न्यायाधीशांचे खंडपीठ रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकते का? यावर सर्वोच्च न्यायालय निर्णय देणार आहे. आज शिंदे गटाने युक्तीवाद केल्यानंतर ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांचा प्रतिवाद केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती