अनुदानासाठी मृत महिलेचा पती असल्याचा तिघांनी दावा केला

शुक्रवार, 18 फेब्रुवारी 2022 (14:16 IST)
कोरोनाने गेल्या 2 ते 2.5 वर्षांपासून उच्छाद मांडला आहे. कोरोनामुळे कित्येकाने आपले प्राण गमावले आहे. कित्येक लोकांनी आपल्या जवळच्या माणसांना गमावले आहे. काही कुटुंबातील मुलं अनाथ झाली आहे. त्यांना आधार  देण्यासाठी राज्य सरकार ने कोरोनामुळे मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला अनुदान देण्याचे जाहीर केले आहे. त्यासाठी अनुदानाची रक्कम 50 हजार आहे. यासाठी मयत व्यक्तीच्या कुटुंबीयांनी अर्ज करावा लागतो. राज्यभरातून अर्ज मागवण्यात येत आहे. पण काही लोक हे अनुदान मिळविण्यासाठी खोटं अर्ज करत असतानाचे आढळून आले आहे. असाच एक प्रकार बीड मध्ये घडला आहे. येथे अनुदानासाठी बीड येथे एका महिलेचा कोरोनाने मृत्यू झाल्यानंतर मिळणाऱ्या अनुदानासाठी तिघांनी महिलेचा पती म्हणून अर्ज केला आहे. हे पाहून प्रशासनांला देखील धक्का बसला आहे. तर प्रशासनाने हे अर्ज नातं जुळत नसल्यामुळे अर्ज नाकारण्यात आले आहे. हे प्रकार पाहून प्रशासन सतर्क झाले आहे. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील अर्ज करणाऱ्यांचे सर्व कागदपत्रांची पडताळणी करून कागदपत्रांचा पाठपुरावा घेऊनच अर्ज स्वीकरण्यात येत आहे. बीड मध्ये कोरोनामुळे 2968 जण मृत्युमुखी झाले आहे. शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी तब्बल 3326 अर्ज प्राप्त झाले आहे. त्यापैकी 2117 अर्ज बरोबर असल्याचे सांगितले जात आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती