नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात दहशतवादी दाऊदच्या जवळचा साथीदार सलीम कुत्ता याच्याबरोबर पॅरोलवर असताना पार्टी करणे सलगी ठेवणे आणि डान्स करणे असे आरोप सुधाकर बडगुजरवर भाजपचे आमदार नितेश राणे व पालकमंत्री भुसे यांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची घोषणा केली. त्यानतंर बडगुजर यांनी शिवसेना कार्यालयात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी ते म्हणाले की, पालकमंत्र्यांनी सभागृहात जे आरोप केलेत, त्यांनी योग्य माहिती घेतली नाही. 2016 मध्ये विजया रहाटकर प्रकरणात वेगळया विदर्भाची मागणी करण्यासाठी त्यांची सभा झाली होती. त्या सभेविरोधात शिवसैनिकांनी आंदोलन केले. त्यामुळे अनेक शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाले. माझ्यावर देखील गुन्हा दाखल होता, मी 15 दिवस जेलमध्ये होतो. जेल मध्ये बॉम्ब स्फोटातील आरोपी होते. त्यांची आम्हाला कल्पना देखील नव्हती. माझ्यावर ज्या काही केसेस दाखल, त्या राजकीय आंदोलनातून. सलीम कुत्ता नाव जोडलं गेलं, त्यांना 93 अटक झाली असेल. मला 2016 मध्ये अटक झाली, त्यावेळी कैदी असतील. व्हिडिओचे मोर्फिंग केलं गेले असावे असेही त्यांनी सांगितले.
गुन्हेगार बाहेर कसा आला? तो पॅरोल वर बाहेर आल्यानंतर सार्वजनिक जीवनात फिरू शकतो, अशा संदर्भातून भेट झाली असेल, सार्वजनिक जीवनात कुठे भेट झाली असेल मला माहित नाही. मॉर्फिंग केलंय, पोलिसांनी चौकशी करावी. तो जेलबाहेर कशासाठी आला परोल वर आला, की आत भेट झाली हे सगळं बाहेर येईल. यावेळी ते म्हणाले राजकारणात बुद्धिबळाचा खेळ सुरू असतो. पोलिसांना चौकशीत सहकार्य करू. शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांना माहिती दिलीय, त्या सविस्तर बोलतील.
यावेळी त्यांनी प्रफुल्ल पटेल इकबाल मिरची संबंध समोर आहे. मागे काही वर्षांपूर्वी दाऊदच्या एका नातेवाईकाच्या लग्नात भाजपचे काही नेते, अधिकारी आले होते, त्यांचे देखील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी ड्रग्स प्रकरणात पालकमंत्री दादा भुसे यांच्यावरच देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांच्या विरोधात काढलेला ड्रग्स विरोधी मोर्चा, सुषमा अंधारे यांची सभा जिव्हारी लागली असेल म्हणून टार्गेट केलं जातंय असेही ते म्हणाले. दादा भुसे नोकरीतून निलंबित का झाले, याच आत्मपरीक्षण करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले.