राज्यात पाचव्या अनलॉकसाठी राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी करण्यात आल्या आहेत. पाचव्या अनलॉकमध्ये सरकारने अनेक गोष्टींना परवानगी दिली आहे. त्यानुसार येत्या 5 ऑक्टोबरपासून 50% क्षमतेने हॉटेल्स, फूड कोर्ट आणि रेस्टॉरंट्स सुरु करता येणार आहेत. यादरम्यान मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणार आहे.
-राज्यांतर्गत लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा सुरु करायला परवानगी
- ऑक्सिजन निर्मिती आणि वाहतुकीवर कसलेही निर्बंध नाही
- पुणे विभागातील लोकल ट्रेन सुरू होणार
काय बंद राहणार
शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस, शैक्षणिक संस्था, सिनेमा हॉल, स्विमिंग पूल, इंटरटेनमेंट पार्क