'म्हणून' राज ठाकरे यांनी विधानभवनात येण्याचे टाळले

मंगळवार, 2 मार्च 2021 (17:02 IST)
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे विधान भवनात जाणार होते. मात्र, नियमानुसार राज ठाकरेंना विधानभवनात प्रवेश करण्यासाठी कोविड १९ची आरटीपीसीआर ही चाचणी करणे बंधनकारक होते. कारण नियमानुसार त्यांना चाचणी केल्याशिवाय विधान भवनात प्रवेश दिला नसता. तसेच राज ठाकरेंनी आरटीपीसीआर चाचणी देखील केली नसल्याने स्वत: राज ठाकरे यांनी विधानभवनात येण्याचे टाळले. 
 
राज ठाकरे यांनी आरटीपीसीआरची चाचणी केली नसल्याने ते स्वत:चा विधानभवनात आले नाही. विशेष म्हणजे राज ठाकरे मास्क देखील लावत नाही. त्यांनी सुरुवातीपासूनच तोंडाला मास्क लावले नव्हते. याबाबत त्यांना माध्यमांनी विचारणा केली असता ‘मी मास्क लावत नाही’, असे देखील त्यांनी स्पष्ट केले. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरे शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिम कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांना माध्यमांनी विचारणा केली की, सार्वजनिक ठिकाणी तुम्ही येता आणि मास्क लावत नाही. तुम्ही मास्क लावत नाहीत का? यावर ते म्हणाले ‘मी मास्क लावत नाही. हे तुम्हालाही सांगतो’.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती