तर मी गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो : एकनाथ खडसे

शुक्रवार, 10 फेब्रुवारी 2023 (21:46 IST)
कार्यक्षम, दूरदृष्टीचा आणि सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री असेल तर मी गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देऊ शकतो, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी केलंय. जळगाव येथे एकनाथ खडसे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले, सुरेश दादा जैन हे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी स्वतः बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेतली होती. मात्र मला जो मुख्यमंत्री पाहिजे आहे, तो कार्यक्षम, दूरदृष्टीचा व सामाजिक हिताचा निकष पूर्ण करणारा मुख्यमंत्री पाहिजे.माझं मत मी त्यावेळीदेखील शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे व्यक्त केलं होतं.
 
मात्र या निकषात जर आता गिरीश महाजन बसत असतील तर मुख्यमंत्री पदासाठी गिरीश महाजन यांना देखील माझा पाठिंबा असेल, असं मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले आहे.
 
दरम्यान आपल्या परिसरात विद्यापीठ पशुवैद्यकीय महाविद्यालय यासह सिंचनासाठीचा निधी मिळावा . आपला परिसर सुजलाम् सुफलाम् व्हावा यासाठी माझा आग्रह आहे. मद कितीही कट्टर दुश्मन असेल तरी मुख्यमंत्री पदासाठी माझा त्यांना पाठिंबा राहील असे मतही खडसेंनी व्यक्त केले आहे.
 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती