सोनई हत्याकांड, सातपैकी सहा आरोपी दोषी

सोमवार, 15 जानेवारी 2018 (15:20 IST)

सोनई हत्याकांड प्रकरणी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने सातपैकी सहा आरोपींना कोर्टाने दोषी ठरवले आहे. दोषीना १८ जानेवारीला शिक्षा सुनावण्यात येणार आहे. तर एकाला निर्दोष सोडण्यात आलं आहे. 

 

अहमदनगर जिल्ह्यातल्या नेवासा तालुक्यातील सोनई येथे ३ जानेवारी २०१३ रोजी ३ जणांची निर्घूण हत्या करण्यात आली होती. आता या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अश्या एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती. 

 

याप्रकरणात सोनईतील गणेशवाडी येथे असेलेल्या दरंदले वस्तीत राहणा-या ३ सफाई कामगारांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांना १ मृतदेह सेफ्टी टँकमध्ये तर २ मृतदेह विहीरीत आढळून आले होते. या संदर्भात प्रथम २ संशयीतांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर तपास करुन ३ आरोपींना अशा एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली होती. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती