शिवसैनिकाकडून इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द येणार नाहीत

कोणत्याही शिवसैनिकाकडून इंदिरा गांधी यांच्याबद्दल अपशब्द येणार नाहीत, असे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. संजय राऊत यांच्या विधानाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर त्यावर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, संजय राउत यांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. संजय राऊत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना स्वतः इंदिरा गांधींबद्दल आदर होता. त्यामुळे कोणत्याही शिवसैनिकाकडून त्यांच्याबद्दल अपशब्द येणार नाही.
 
राऊत यांनी केलेलं विधान हे वेगळ्या संदर्भता होतं, त्यांचे ते निरिक्षण होतं. त्यामुळे प्रत्येक विधानं हे त्या संदर्भातणं बघणं गरजेचं आहे. या मुद्द्यावर विरोधकांना प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती