ग्रामदैवत श्री सिध्देश्वर यात्रेच्या तिसर्या दिवशी होमविधीनंतर झालेल्या वासराच्या भाकणुकीतून यंदाच्या वर्षी पाऊसमान सामान्य राहणार असल्याचे भाकीत मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी व्यक्त केले. वासरासमोर गूळ, गाजर, गहू, तांदूळ, पेरू, बोर, ऊस, पाने आदी वस्तू ठेवण्यात आली होती. मात्र कोणत्याही वस्तूला वासराने तोंड लावले नाही.
त्यावरून जीवनावश्क वस्तूंचे दर स्थिर राहतील. वासरू भयभीत झाले नव्हते. त्यामुळे सामाजिक स्थिती शांततेचे राहणार असून वासराने मलमूत्र केले नाही. या अंदाजावरून पाऊसमान सामान्यच राहील, असेही हिरेहब्बू यांनी सांगितले.