महागाईचा दर पाच वर्षांमधला सर्वात उच्चांकावर पोहोचला

मंगळवार, 14 जानेवारी 2020 (10:14 IST)
डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर हा ७.३५ टक्के इतका पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी नोंदवला गेला आहे. याआधी जुलै २०१४ या महिन्यात महागाईचा दर ७.३९ टक्क्यांवर पोहचला होता. त्यानंतर आता डिसेंबर महिन्यात म्हणजेच मागच्या महिन्यात हा दर ७.३५ टक्के इतका नोंदवला गेला आहे. २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.५४ टक्के होता. तर २०१८ च्या डिसेंबर महिन्यात हा दर २.११ टक्के इतकाच होता.
 
इंधन दराने डिसेंबर महिन्यात काहीसा दिलासा दिला. आता केंद्र सरकारने सोमवारी महागाईची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीमध्ये डिसेंबर महिन्यातला किरकोळ महागाई दर ७.३५ टक्के इतका पोहचला आहे. पाच वर्षांमधला हा सर्वात उच्चांकी दर आहे. डिसेंबर महिन्यात कांदाही १२५ ते १५० रुपये प्रति किलो गेला होता. अवकाळी पावसाच्या अस्मानी संकाटामुळे शेतीचं नुकसान झालं होतं. भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने किंमती वाढल्या होत्या.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती