रत्नागिरी जिल्ह्यात त्यांच्या प्रवेशामुळे भाजपला खिंडार पडले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या आश्वासनावर त्यांनी भाजपत प्रवेश केला होता. परंतू दिवसेंदिवस वाढत जाणारी महागाई, पेट्रोल- डिझे- गॅस सिलिंडरचे वाढते भाव हे पाहून जनतेचा आता भ्रमनिरास झाला आहे. तसेच विरोधकांचे नामोहरम करण्यासाठी ईडी व सीबीआय या यंत्रणेचा गरवापर देखील केला जात असल्याचा आरोप मोरे यांनी केला आहे. त्यामुळे आता केवळ शिवसेनाच सर्वसामान्य नागरिकांना न्याय देईल असा विश्वास मोरे यांनीव्यक्त केला आहे.