इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीचे वर्ग सुरु होण्याचे संकेत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले

शनिवार, 23 ऑक्टोबर 2021 (09:49 IST)
कोरोनामुळे राज्यातील शाळा महाविद्यालये ,शिकवणी वर्ग बंद होते. आता शहरी भागात आठवी ते बारावी वर्ग सुरु आहे. आता ग्रामीण भागात पाचवी ते बारावी वर्ग सुरु झाल्यानंतर आता शिक्षण विभाग इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीचे वर्ग सुरु करण्याचा हालचाली करत आहे. त्या साठी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी गुरुवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ऑनलाईन चर्चा केली.
 
दिवाळी नंतर हे वर्ग सुरु करण्यात येतील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता बालवाडीचे वर्ग देखील सुरु करण्याची शक्यता वर्तवली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे ऑनलाईन वर्गाला सर्व विद्यार्थी वैतागले आहे. दिवाळी नंतर कोरोनाची आकडेवारी बघून पुढील निर्णय घेता येईल. असं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले.
 
सध्या शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 चे वर्ग सुरु आहेत.ग्रामीण भागात इयत्ता  5 वी ते महाविद्यालयीन वर्ग भरवले जात आहे. राज्यातील कोरोनाचा आढावा घेतल्यावर प्रकरणात वाढ जाहली नसल्यास शाळा उघडल्याचे निर्णय घेतले जातील. या संदर्भात अंतिम निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती