रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर येथे आज आणखी दोन ऑलिव्ह रिडले सागरी कासवांना सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले.रेवा आणि लक्ष्मी अशी या कासवांची नावे आहेत. काल वनश्री नावाचे कासव गुहागर समुद्रकिनारी सोडण्यात आले. यापूर्वी प्रथमा आणि सावनी या कासवांना वेळास आणि रत्नागिरी येथून सॅटेलाइट ट्रान्समीटर बसविण्यात आले होते.