थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांची कन्या आणि शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या लहान भगिनी श्रीमती संजिवनी करंदीकर यांचं आज (13 मे) पुण्यात निधन झालं आहे. वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं. मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या त्या आत्या होत्या व किर्तीताई फाटक यांच्या मातोश्री होत्या.