उदय शेट्टी आणि मजनू मध्ये संजय राऊतांचा घुंगरू सेठ झालाय’

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (15:16 IST)
अहमदनगर येथील रुग्णालयात अतिदक्षता विभाग कक्षाला आग  लागून 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यु (Died) झाला होता. या घटनेवरून महाराष्ट्रात सत्ताधारी महाविकास आघाडी आणि भाजप याच्यांत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या. त्यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत  यांनी या आगीच्या घटनेवरून केंद्राला लक्ष्य केलं होतं. यानंतर आता महाराष्ट्र भाजपाच्या (BJP) चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना प्रत्युत्तर दिलं आहे.
 
चित्रा वाघ  बोलताना म्हणाल्या की, ‘सर्वज्ञानी संजय राऊत नगरच्या आगीच खापर केंद्रावर फोडत आहे. पण व्हेंटिलेटर नव्हे संजय राऊत यांची मानसिकताच निकृष्ट बनलीय, असा जोरदार घणाघात चित्रा वाघ यांनी केला आहे. पुढे चित्रा वाघ म्हणाल्या, ‘डॉक्टर, नर्स यांना बडतर्फ करण्यात सरकार कोणता पुरुषार्थ दाखवतेय. नगर दुर्घटना ही दुर्देवी घटना आहे. हे सरकारी अनास्थेचे बळी आहेत. डॉक्टर आणि काही नर्सला बडतर्फ केले. त्यांचे हे कामच नाही. कारवाई करायची असले, तर वैद्यकीय अभ्यासक्रमात आग नियंत्रणाचा समावेश करा, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
 
दरम्यान, चित्रा वाघ म्हणाल्या, PWD वर प्रश्नचिन्ह का नाही. डॉक्टर बडतर्फ होत असेल, तर मंत्री का नाही? या प्रश्नी श्वेतपत्रिका काढा. भंडाऱ्याच्या घटनेनंतर सरकारी रुग्णालयाचे ऑडिट करू असे आश्वासन दिले होते. पण केले नाही. सरकार फक्त खंडणी गोळा करतेय. 11 लोकांचे बळी घेऊनही सरकारची भूक शमलेली नाही. 1 वर्ष जुनी इमारत असूनही आग कशी लागते, असा जोरदार सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती