रोहित पवारांच्या जीवाला धोका, पोलीस संरक्षण देण्याची सुप्रिया सुळे यांची मागणी

शुक्रवार, 22 मार्च 2024 (14:01 IST)
आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार संविधानिक पद्धतीने लोकशाही मार्गानी, शांतपणे लोकांशी सुसंवाद साधत आहे. काही ठिकाणी लोक त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्नात आहे. त्यांच्या जीवाला धोका आहे. त्यांना तातडीने पोलीस संरक्षण द्यावे असे सुप्रिया सुळे यांनी आपल्या पत्रातून पोलीस अधीक्षकांना म्हटले आहे. त्यांना दडपशाहीचा सामना करावा लागत आहे. काही जण त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. विविध वृत्तवाहिन्या मधून ही घटना सर्वांसमोर आली आहे. ही कृती असंविधानिक आहे. सर्वसामान्य नागरिकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यचा गळा घोटणारी आहे. सुसंस्कृत पुणे जिल्ह्यात हे अपेक्षित नाही. या मुळे त्यांना तातडीने सुरक्षितेची खबरदारी घेऊन आवश्यक सुरक्षा पुरवण्यात यावी अशी विनंती. असे पत्र सुप्रिया सुळे यांनी पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांना लिहिले आहे. 
 
 Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती