वाचा, केंद्र सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला

शनिवार, 28 ऑगस्ट 2021 (08:15 IST)
काही दिवसांपासून टोमॅटोला तीन रुपये किलो भाव मिळत असल्याने बळीराजा हतबल झाला आहे.उत्पादन खर्च निघत नसल्याने शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या आवारात टोमॅटो टाकून संताप व्यक्त केला. बाजारात २० किलोच्या जाळीला ६० रुपये भाव मिळतो. त्यातून उत्पादन, वाहतूक खर्च देखील भरून निघणार नसल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. आता शेतकऱ्यांचं नुकसान पाहता केंद्र सरकारने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला.केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी ही माहिती दिली आहे.
 
केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी पत्रकारांना टोमॅटोचा दर त्याच्या निर्यातीची माहिती दिली.“टोमॅटोच्या बाबतीत भाव कमी झालेत.याबाबत शेतकऱ्यांनी सांगितलं आणि चर्चा देखील केली.त्यानंतर माझं मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणं झालं.तेव्हा त्यांनी सांगितलं टोमॅटोची निर्यात खुली आहे.आपण कुठल्याही प्रकारे बंदी आणलेली नाही. निर्यात खुली असून ज्यांना ती करायची आहे त्यांनी करावी.त्यानंतर कृषीमंत्री तोमर यांच्याशी देखील चर्चा झाली. त्यांनी तात्काळ निर्णय घेतला की, जिथे टोमॅटोचे भाव प्रचंड कमी झालेआहेत.त्याचा शेतकऱ्यांना फटका बसतोय. तिथे एमआयएस स्किम आहे. मार्केट इम्प्रुमेंटल स्किमचं नोटीफिकेशन जारी केलं आहे. राज्य सरकारला पत्रही लिहीलं आहे. राज्य सरकारने तात्काळ पत्र पाठवावं. यामध्ये राज्यांनी खरेदी केलेल्या मालाच्या नुकसानीत केंद्र ५० टक्के वाटा उचलणार आहे.केंद्राचं हे धोरण शेतकऱ्यांसाठी आहे”,असं केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी सांगितलं.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती