दुसरीकडे नागपुरमध्ये कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाने १४ मार्चपर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे गर्दी होत असलेल्या भागांत लॉकडाऊनचे संकेत महापालिका आयुक्तांनी दिलेत. शहरातील जाधववाडी मंडी, गुलमंडी बाजार, कॅनॉट परिसर या भागांवर लक्ष केंद्रीत केल्याचं आयुक्त म्हणाले. पुढचे काही दिवस इथली रुग्णसंख्या वाढत राहिली तर हे भाग बंद करण्याशिवाय पर्याय नसल्याचं आयुक्तांनी सांगितलं. संपुर्ण शहरात लॉकडाऊन होणार नाही असंही आयुक्तांनी स्पष्ट केलं.