माझा शेतकऱ्यांच्या भावनेला पाठिंबा : राज ठाकरे

शनिवार, 3 जून 2017 (09:50 IST)

भाजपा सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली आहे. तिकडे सीमेवर जवान आणि इकडे शेतकरी मरतायेत, मात्र भाजपावाले खुशाल आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. यापुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो. मात्र, जे गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले, ते शेतक-यांच्या बाबतीत होऊ नये. माझा शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांसोबत मी कायमच आहे.  शेतक-यांच्या संपात अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर त्यांनी करावे, पण शेतक-यांचा प्रश्न सोडवावा. सर्वात ते महत्त्वाचं आहे, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले. 

 
सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहीत नव्हतं का? योजनांना गोंडस नावे देऊन सरकार जनतेला भुलवतंय असेही राज ठाकरे म्हणाले.  राज ठाकरेंनीशिवसेनेवरही हल्लाबोल केला. शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असे ते  म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा