मोठी कारवाई, १३ लाखांची एमडी, ७.८ लाखांची चरस आणि अडीच किलो गांजा जप्त

मंगळवार, 18 मे 2021 (10:02 IST)
नागपूर शहर पोलिसांनी ८६ ठिकाणी छापेमारी करून १३ लाखांची (१३० ग्रॅम) एमडी, ७.८ लाखांची (१३३ ग्रॅम) चरस आणि अडीच किलो गांजा जप्त केला.
 
पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दुपारी शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन शहरातील ड्रग तस्कर तसेच ड्रग पेडलर्स यांच्याकडे एकाचवेळी नियोजनबद्धरीत्या कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कारवाईसाठी एकूण ८६ पथके तयार करण्यात आली. या पथकाने शहरातील अमली पदार्थाचा व्यवसाय 
करणाऱ्या ८६ गुन्हेगारांशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. दुपारी ४ वाजतापासून सुरू झालेली ही कारवाई रात्री ११.१५ वाजेपर्यंत सुरूच होती. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी
 
१३० ग्रॅम एमडी, १३० ग्रॅम चरस आणि अडीच किलो गांजा असे एकूण १९ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले.
 
या कारवाई दरम्यान २० आरोपींना ताब्यात घेण्यात आले. कारवाईदरम्यान काही ठिकाणी जुगार अड्डे पोलिसांना सापडले. तर काही गुन्हेगारांकडे शस्त्रही सापडले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती