प्रवीण राऊत यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी

गुरूवार, 24 फेब्रुवारी 2022 (21:16 IST)
शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडी देण्यात आल्यामुळे प्रवीण राऊत यांचा जामीनाचा मार्ग मोकळा झाला आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आणि भूखंड खरेदी प्रकरणात प्रवीण राऊत यांना ईडीने अटक केली आहे.
 
प्रवीण राऊत यांना २ फेब्रुवारीला १ हजार ३४ कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्यामध्ये ईडीने अटक केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांचे प्रवीण राऊत हे निकटवर्तीय आहेत. प्रवीण राऊतांच्या अटकेनंतर संजय राऊतांनी ईडीविरोधात संताप व्यक्त करत गंभीर आरोप केले होते. प्रवीण राऊत यांची ईडी कोठडीतील मुदत संपत असल्यामुळे त्यांना कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने त्यांना ७ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती