अभिनेत्री प्राजक्ता माळी यांनी आज पत्रकार परिषद् घेतली अणि त्यातून त्यांनी सुरेश धस यांना सड़ेतोड़ उत्तर दिले आहे. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात सरपंच सुरेश देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणामुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात सुरेश धस यांनी आकाचा उल्लेख केला मात्र हे आका कोण आहे याचा उल्लेख केला नाही. या प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांना टार्गेट केल्याच दिसून आले.
प्राजक्ता म्हणाल्या, सुरेश धस यांनी काल प्रसार माध्यमांशी बोलताना जे काही म्हटले आहे. मी त्याचा निषेध करते. या साठी मी पत्रकार परिषद् बोलावली आहे.मलाघेऊन ट्रोलिंग केले जात आहे. मी गेल्या दीड महिन्यांपासून शांत आहे. याचा अर्थ असा नहीं की माझी या साठी मूक संमतिआहे. त्यांच्या निराधार विधानामुळे मला मनस्ताप सहन करावा लागला आहे. त्यांनी या प्रकरणी आमची जाहीर माफ़ी मागावी.
कलाकार महिलांना सॉफ्ट टार्गेट का केले जाते. कलाकारांना या प्रकरणात का खेचले जाते. आमचा काय संबंध. तुम्ही स्वत:चे नाव करायला महिला कलाकारांची नावे घेतली. महिलांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. कोणी यावं आणि नाव घेऊन जावं. वैयक्तिक राजकारणासाठी सिने सृष्टीतील महिलांच्या नावाचा गैवापर कोणीही करू नये असे म्हणत त्यांना रडू कोसळले.