कोकणातला बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत

सोमवार, 26 जुलै 2021 (23:28 IST)
कोकण प्रादेशिक क्षेत्रातील महापुरामुळे खेड, चिपळूण, राजापूर तसेच संगमेश्वर तालुक्यातील वीज यंत्रणा पाण्यात बुडून आपत्कालीन परिस्थितीत वीज पुरवठा बंद केला होता. आता पूर ओसरताच महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी अथक परिश्रम घेऊन बहुतांशी भागातील वीज पुरवठा सुरळीत केला आहे.
 
कोकण प्रादेशिक क्षेत्रात येणाऱ्या खेड येथील 14, 8087, रत्नागिरी विभागातील 1, 15, 273 आणि चिपळूण विभागात 50, 977 अशी एकूण 3 लाख 14 हजार 337 वीज कनेक्शन बंद पडली होती, 24 तासांत यापैकी 2 लाख 87 हजार 737 वीज कनेक्शन सुरू करण्यात यश आले आहे.
 
महापुरामुळे चिपळूण येथे वीज पुरवठा करणार्‍या चार उपकेंद्रात पाणी भरले होते. यापैकी खेर्डी उपकेंद्र येथे 7 फूटपर्यंत पाणी साचल्यामुळे सर्व पॅनल, वीज यंत्रणा चिखल गाळाने भरून गेली होती. पुराची तीव्रता कमी होताच या चार पैकी एक उपकेंद्र सुरू करण्यात आले.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती