पोलिसांनी जुगाऱ्यांकडून जप्त केला इतक्या लाख रुपयांचा मुद्देमाल !

गुरूवार, 23 डिसेंबर 2021 (08:28 IST)
एखाद्या जुगार अड्ड्यावर छापा मारल्यावर जास्तीत जास्त किती रुपयांचा मुद्देमाल आढळून येऊ शकतो याचा तुम्ही कधी विचार केलाय का ?
नाशिक शहर पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत २७ जुगाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
नाशिक शहरातील उपनगर भागात पोलिसांना जुगार अड्डा सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाली होती.
पोलिसांनी एक टीम तयार केली आणि या ठिकाणी रेड केली. यावेळी एकूण २७ जुगारी मिळून आले आणि जवळपास ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. शहरात दिवसेंदिवस गुन्ह्गारी वाढतांना दिसून येतय. यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी पोलिसांना अधिकाऱ्यांना कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.
नाशिक शहरात अवैध जुगार, रोलेट, मटका खेळणारे अड्डे बिनधास्तपणे सुरू असल्याचे दिसून येते. यावर बऱ्याच वेळेला कारवाई केली जाते मात्र काही दिवसानंतर हे अड्डे पुन्हा सुरु झालेले असतात. अशा ठिकाणी समाजकंटकांची मोठी गर्दी दिसून येते. अशाच एका अद्द्याची माहिती उपनगर पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता हा अड्डा एका बंदिस्थ फ्लॅट सुरु होता.
 
हा बंदिस्थ फ्लॅट नाशिकरोड जेल रोड भागातील कैलाशजी हौसिंग सोसायटी मधील आहे. पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एकूण २७ जुगाऱ्यांना पोलिसांनी अटक केली असून तब्बल ६८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलं आहे. सदर कारवाई बाबत उपनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम १८८७ चे कलम ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 
निवासी इमारतीमध्ये कुठलेही अवैध धंदे करू नये असे आदेश असताना सुद्धा, कैलाशजी सोसायटीत जुगार अड्डा सुरु असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदर फ्लॅटचा भोगवटा रद्द होण्याबाबत तसेच पाणी आणि वीज कनेक्शन बंद करण्यासाठी संबधित विभागाशी पत्र व्यवहार केला जाणार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
 
शहरात सध्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. दिवसाढवळ्या महिलांची सोनसाखळी चोरी जाणे, मोटार सायकल चोरी होणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर अवैध धंदे बिनदिक्कत सुरु असल्याचं यातून समोर आलंय. याचा काय बोध घ्यावा अशी चर्चा सध्या नाशिककर करत आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती