मिळालेल्या माहितीनुसार, बँकेचे कर्ज थकवल्या प्रकरणी नाशिक जिल्हा बँकेने माजी खासदार समीर भुजबळ आणि माजी आमदार पंकज भुजबळ यांना नोटीस बजावली आहे. भुजबळ कुटुंबीयांच्या मालकी असलेल्या मालेगावच्या दाभाडी येथील आर्मस्ट्राँग साखर कारखान्यावर असलेल्या थकीत 51 कोटी 66 लाख थकीत कर्ज वसुलीसाठी बँकेकडून नोटीस बजावण्यात आली आहे. बँकेच्या अधिकाऱ्यांनी दाभाडी येथे जाऊन आर्म स्ट्रॉंगच्या गेटवर चिटकवली नोटीस आहे.
छगन भुजबळ काय म्हणाले?
बँकेच्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना छगन भुजबळ म्हणाले, 'आम्ही 12कोटी रुपये आर्मस्ट्राँग काखान्यावर कर्ज घेतलं होतं. ईडीने हा कारखाना अटॅच केला आहे. बँकेने तो कारखाना कधीही लिलाव केला तर यापेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतील. कायदा कायदा आहे, छगन भुजबळ काही कायद्याच्या पुढे मोठा नाही. त्यामुळे बँकेकडून कर्ज घेतलं असेल तर नोटीस जाणारच'.