चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदले : नितेश राणे

''चॉकलेट तेच आहे, मात्र केवळ रॅपर बदलले आहे,'' असे म्हणत आमदार नितेश राणे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अहवाल राणे समितीने सादर केला होता, हा अहवाल उच्च न्यायालयाने रद्द केला नव्हता. तर राज्य सरकारने  उच्च न्यायालयात योग्य पद्धतीने बाजू मांडली नव्हती, असा आरोपही नितेश राणे यांनी यावेळी केला.  
 
पारित झालेले आरक्षण हे राणे समितीने दिलेल्या अहवालासारखेच आहे, असे सांगण्याचा प्रयत्न नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, नारायण राणे यांनीही मागासवर्गीय आयोगाने दिलेला अहवाल आणि आधीचा राणे समिताचा अहवाल सारखाच असल्याचा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला. त्यामुळे हा माझा विजय  असल्याचा दावा केला आहे.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती