ही घटना महाराष्ट्राच्या नाशिकच्या वसंतराव पवार मेडिकल रुग्णालयात घडली आहे. महिलेची प्रसूती होत असताना बाळ डॉक्टरांच्या हातातून निसटून त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून डॉक्टरांनी बाळ आधीच दगावल्याचे सांगितले. डॉक्टरांनी दिशाभूल करण्याचा करण्याचा आरोप कुटुंबीयांनी केला असून डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून कुटुंबीयांनी नाशिकच्या आडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.