सध्या पावसाचा जोर सर्वत्र कमी झाला आहे. पावसाळयात विविध साथीचे आजार पसरतात. राज्यात आय फ्लू नंतर आता मलेरिया आणि डेंग्यूच्या आजाराचे प्रमाण अधिक झाले आहे. मलेरिया आणि डेंग्यूचा साथीचा आजाराचा प्रादुर्भाव वाढत आहे. तसेच चिकनगुनिया देखील वाढत आहे. 24 ऑगस्ट रोजी राज्यात मलेरियाचे 2 हजार हुन अधिक रुग्ण आढळले. मलेरियाच्या रोगानंतर राज्यात ऑगस्ट मध्ये एकूण 1 ,808 डेंगीचे रुग्ण देखील आढळले आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबईत मलेरियाचे प्रमाण वाढले असून काही ठराविक जिल्ह्यात मलेरिया, चिकनगुनिया आणि डेंगीचे रुग्ण आढळले आहे. तर पुणे, ग्रामीण भागात, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नागपूर जिल्ह्यत चिकनगुनियाचे रुग्ण आढळले आहे. ऑगस्ट अखेर पर्यंत चिकनगुनियाच्या एकूण 444 रुग्णांची नोंद झाली आहे.
पावसाळ्यात डासांचा प्रादुर्भाव होऊ नये या साठी
आजूबाजूला पाणी साचू देऊ नका. डास चावू नये यासाठी बाजारात मिळणारी औषधे लावा किंवा इतर पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. शरीर झाकणारे कपडे घाला. मच्छरदाणीचा वापर करा.रोग प्रतिकारक शक्ती वाढवणाया आहाराचा सेवन करा. फळे, भाज्या, कडधान्यांचा आहारात समावेश करा. भरपूर पाणी प्या आणि पुरेशी झोप घ्या.