कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरमध्ये

बुधवार, 2 जून 2021 (16:30 IST)
मुंबईत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारण्यात आले आहेत. बीकेसीतल्या कोविड सेंटरमध्ये अपुऱ्या सुविधा आणि अनुभव नसणारे डॉक्टर, कर्मचारी आहेत असा आरोप मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला होता. यानंतर आठवडाभराचे अल्टिमेटमही कंत्राटदारांना देण्यात आले होते परंतु वेळ देऊनही सुविधा उपलब्ध केल्या नसल्यामुळे कंत्राटदाराला जाब विचारण्यासाठी संदीप देशपांडे यांच्या नेतृत्वात मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरमध्ये दाखल झाले. यावेळी कंत्राटदाराला जाब विचारताना बाचाबाची झाली आहे.
 
बीकेसी कोविड सेंटरमध्ये आठवड्याभरात डॉक्टरांची नेमणूक करावी तसेच या सर्व प्रश्नांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पण तयार आहोत. सगळ्या पेशंटच्या इथे कॅमेरे लावले आहेत. परंतु आपल्या पेशंटसोबत काय होतंय हे बाहेरच्या लोकांना कळतं नाही त्यामुळे या सीसीटीव्ही कॅमेरांचा एक्सेस रुग्णाचा नातेवाईकांना द्यावे जेणेकरून आतमध्ये काय सुरु आहे हे त्यांना कळेल अशी महत्त्वाची मागणी आहे. यासंदर्भातील पत्र मनसेचे अखिल चितळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि डॉ. डेरेंनाही दिले होते परंतु यावर अद्याप कोणाकडूनही स्पष्टिकरण आले नाही यामुळे शेवटी मनसेचे शिष्टमंडळ बीकेसी कोविड सेंटरवर दाखल झाले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती