नाणार प्रकल्पाविरोधात मिस्ड कॉल अभियान

सोमवार, 30 एप्रिल 2018 (16:47 IST)
कोकणातील नाणार येथे होऊ घातलेल्या ग्रीन रिफायनरीमुळे तेथील निसर्गाची प्रचंड हानी होणार आहे. कोकणची शान असलेला देवगड आणि रत्नागिरीचा हापूस आंबा, येथील काजू उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. येथील समुद्रांची जैवविविधताही धोक्यात आली असून कोकणची राख करणाऱ्या या प्रकल्पाला तीव्र विरोध दर्शविण्यासाठी शिवसेनेचे जितेंद्र जनावळे यांनी मिस्ड कॉल अभियान सुरू केले आहे. नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा तीक्र विरोध असून शिवसैनिक आपापल्या परीने या प्रकल्पाविरोधात रान उठवत आहेत.
 
शिवसैनिक जितेंद्र जनावळे यांनीही यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या प्रकल्पाला विरोध करणारे स्टिकर्स ते गाडय़ांवर लावत आहेत. या प्रकल्पात सामील होण्यासाठी त्यांनी मिस्ड कॉल अभियान हाती घेतले आहे. ते चिटकवत असलेल्या स्टिकरवर जो मोबाईल क्रमांक असेल त्यावर मिस्ड कॉल करून या प्रकल्पाला विरोध करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती