पेट्रोल दरवाढीमुळे घेतला घोडा

मंगळवार, 26 ऑक्टोबर 2021 (17:47 IST)
पेट्रोल 114 रुपये लिटरच्या घरात गेले आहे. पेट्रोलच्या किंमतीत रोज होणारी वाढ यामुळे वाहन चालकांना दररोज धक्का बसत आहे. मात्र जिल्ह्यातील तेंडोळी येथील दत्ता थावरा राठोड यांनी पेट्रोल वाढीला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी चक्क दुचाकी विकून पंधरा हजार पाचशे रूपयांचा घोडा(तट्टू) घेतला. या घोड्यावरूनच ते रोज पंधरा ते वीस किलोमीटरचा प्रवास करतात. घोडा घेतल्याने आता पेट्रोलचे भाव कितीही वाढले तरी मला काही घेणे देणे नसल्याचे दत्ता राठोड यांचे म्हणणे आहे. 
 
दुचाकीला टायर, ऑईल चेंज, पंचर, हवा भरणे आणि त्याला लागणारा पेट्रोल हे सर्व सामान्य नागरिकांना न परवडणारे ठरत आहे. पेट्रोल 114.72 रूपये प्रती लिटर झाले. दत्ताने घोडा घेतल्याने पेट्रोलच्या किंमतीत कितीही वाढ झाली तरी याने आता काही फरक पडणार नाही. त्यामुळे पेट्रोलची डोकेदुखी दुर करायची असेल तर घोडा घ्या किंवा सायकलने प्रवास करा असे ते इतरांना सांगत आहेत.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती