आजपासून म्हणजेच 15 जून 2023 पासून राज्यातील शाळा सुरु झाल्या आहेत. नवीन सत्र म्हणून शाळेत विद्यार्थ्यांचे आनंदात स्वागत करण्यात आले आहे.
राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला 15 जून 2023 पासून सुरूवात होत असून विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे.
याच पार्श्वभूमीवर दिपक केसरकर यांनी सांगितले की विद्यार्थ्यांवरील दप्तराचे ओझे कमी करण्यात आले आहे. कारण आता एकाच पुस्तकामध्ये सर्व विषयांचा अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला आहे.
शेतीच्या ज्ञानाची आवश्यक बघता यापुढे शेती विषय शिकवण्यात येणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना यूनिफॉर्म, शूज- सॉक्स देण्यात येत आहेत.
मात्र विदर्भातील शाळा आजपासून सुरु होणार नसून येत्या 30 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली.