सरकारचा वर्धापन दिन ३१ ऑक्टोबर, त्याच दिवशी दुष्काळ जाहिर करण्याचा आग्रह - पृथ्वीराज चव्हाण

सरकारचा वर्धापन दिन ३१ ऑक्टोबर असल्यामुळे सरकार व मुख्यमंत्री त्या दिवसाची वाट पाहत आहेत. त्याच दिवशी दुष्काळ जाहिर करण्याचा आग्रह धरल्या असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला.सध्या दुष्काळ असतानाही मुख्यमंत्री मात्र दुष्काळजन्य स्थिती म्हणून दिशाभूल करत आहेत.

लातूर जिल्ह्याचा समावेश दुष्काळजन्य परिस्थिती आढाव्यात न करता अन्याय झाला आहे. हे सरकार सर्व सामान्य जनतेचे नसून विशिष्ट घटकाचे असल्याचा चव्हाण म्हणाले. जिल्ह्यात पाण्याची भीषणता आहे. खरिपातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सर्व रब्बी हंगाम धोक्यात असताना खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा निसर्गाशी संघर्ष सुरू आहे. त्यामुळे संघर्ष यात्रेच्या माध्यमातून दुष्काळनिमित्त पाहणीचे आहे. केंद्र व राज्य सरकार जनतेचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले आहे त्यात कालपासून चाललेला CBI चा गोंधळ त्याचे उत्तम उअदाहरण आहे.

मोदी सरकारला राफेल घोटाळा उघडा पडण्याच्या भितीने मोदींनी ब्युरोचीफ यांना सक्तीच्या रजेवर पाठवल्याचा आरोप चव्हाण यांनी केला आहे. लातूर जिल्ह्यातील आज उदगीर येथे जनसंघर्ष यात्रेचा समारोप झाला या यात्रेमधून जिल्ह्यातील दुष्काळाचा आढावा कॉंग्रेसने घेतला आहे आता ही यात्रा नांदेड जिल्ह्यात गेली आहे.

मोदी सरकारने आजपर्यंत केलेल्या सर्व योजना फसव्या आहेत. कर्जमाफीचा आकडा जो सरकार देते आहे ती आकडेवारी फसवी असल्याचाही आरोप चव्हाण यांनी केला. निवडणुका आल्या की यांना राम मंदीर आठवते याची आठवण चव्हाण यांनी करुन दिली. यावेळी धिरज देशमुख, मोइज शेख, दिपक सुळ व कॉंग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती