Kali pivli taxi : मुंबईच्या रस्त्यावरून सोमवार पासून काळी-पिवळी पद्मिनी टॅक्सीला कायमचा ब्रेक
रविवार, 29 ऑक्टोबर 2023 (13:51 IST)
भारताची औद्योगिक शहर म्हणवल्या जाणाऱ्या मुंबईच्या रस्त्यावर धावणारी काळी-पिवळी पद्मिनी टॅक्सी आता मुंबईच्या धावत्या रस्त्यावरून सोमवार पासून कायमची गायब होणार आहे.
मुंबईत चालणाऱ्या डबल डेकर बस नंतर आता काली -पिवळी पद्मिनी टॅक्सी देखील निरोप घेणार आहे.
काळी पिवळी पद्मिनी टॅक्सी ही मुंबईची शान असून या टॅक्सी ची सुरुवात 1964 साली झाली. तर या टॅक्सी चे उत्पादन 2001 साली बंद करण्यात आले. शेवटची प्रीमियर पद्मिनीची 29 ऑक्टोबर 2003 रोजी ताडदेवच्या आरटीओ मध्ये नोंद झाली.
परिवहन विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नवे मॉडेल्स आई अँप मुळे काळी- पिवळी टॅक्सी बंद करण्याच्या निर्णय घेण्यात आला आहे. मात्र नव्या मॉडेलच्या काळ्या-पिवळ्या टॅक्सी आता मुंबईच्या रस्त्यावरून धावताना दिसणार आहे.