Jalgaon : बाळाच्या अंगावर नागाचा विळखा,आईने वाचवले बाळाचे प्राण

शनिवार, 10 जून 2023 (16:39 IST)
आई ती आईच असते. आपल्या मुलांसाठी ती काहीही करू शकते. असेच प्रत्यय आले आहे जळगावच्या भडगावच्या महिंदळे येथे. या ठिकाणी एक आई आपल्या बाळाचे प्राण वाचविण्यासाठी चक्क सापाशी भिडली. जळगाव जिल्ह्यात महिंदळे येथे रात्री आई आणि तान्हे बाळ झोपलेले असता रात्री बाळ रडू लागले. आईला जाग आल्यावर तिच्या अंगाचा थरकाप उडाला. बाळाच्या अंगावर नागाचा विळखा होता. आईने सापाला हाताने धरून दूर केले असता सापाने आईच्या हातावर दंश केला. मात्र बाळाची सुटका झाली.  
 
ज्योती असे या माउलीचे नाव आहे.काही दिवसांपूर्वी ज्योती आपल्या पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी भडगाव तालुक्यातील महिंदळे आली होती. तिचे सासर एरंडोल तालुक्यातील बांभोरीचे तिला काही दिवसांपूर्वी मुलगा झाला. गेल्या आठवड्यात ती आणि बाळ झोपले असता तिला रात्री बाळाचा रडण्याच्या आवाज आला आणि तिने उठून पहिले तर बाळाला नागाने विळखा घातला होता. नागाला बाळाच्या भोवती पाहून तिच्यात बळ आले आणि तिने तातडीने नागाला बाळापासून ओढून काढले. नागाने तिच्या हाताला दंश केला. पण बाळ सुखरूप होते. नागाने दंश केल्यामुळे तीची प्रकृती बिघडली तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले पाच दिवस ती मृत्यूशी झुंज देत होती. अखेर तिने आयुष्याची लढाई जिंकली.तिला वेळीच सर्पदंश विरोधी लस देण्यात आले.
  
Edited by - Priya Dixit    
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती