छत्रपती संभाजी नगरमध्ये आयकर विभागाचे छापे ; एकाचवेळी इतक्या ठिकाणी कारवाई

गुरूवार, 30 नोव्हेंबर 2023 (21:48 IST)
छत्रपती संभाजी नगरः छत्रपती संभाजी नगरमध्ये गुरुवारी पहाटेपासून आयकर विभागाने छापेमारीला सुरुवात केलेली आहे. शहरातील अनेक बड्या व्यावसायिकांच्या कार्यालयामध्ये आणि घरावर ही छापेमारी सुरुय.
 
छत्रपती संभाजी नगर शहरातील पाच ठिकाणांवर ही छापेमारी सुरु असल्याचं सांगितलं जातंय. २०० अधिकाऱ्यांची पथकं नियुक्त करुन आयकर विभागाने धाड टाकल्याची माहिती आहे.
 
कर चुकवल्याप्रकरणी व्यावसायिकांवर कारवाई केल्याचं बोललं जात आहे. छाड पडलेले लोक बांधकाम व्यावसायिक असून अद्याप त्यांच्याबद्दल अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही.
 
छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. आयकर विभागाची ही कारवाई पुढचे दोन ते तीन दिवस सुरू राहणार असल्याची माहिती समजते आहे. कारवाई नेमकी कोणावर करण्यात आलीय याची माहिती मात्र समजू शकलेली नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती