त्यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्यानंतर सरकारला चांगलेच धारेवर धरले. कोणाला वाचवायचा प्रयत्न असल्याने सरकार एनआयकडे तपास द्यायला तयार नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारकडून एकंदरीत प्रकरणावरून थातूरमातूर उत्तरे दिली जात आहेत. ते पुढे म्हणाले की, सर्व राहणारे ठाण्यामधील आहेत. मनसुख हिरेन यांचा मृतदेह ठाण्यात सापडतो. हा योगायोग नाही. त्यांना सुरक्षा द्या, अशी मागणी केली आहे. मात्र, गृहमंत्र्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचा आम्हाला संशय आहे असे फडणीस यांनी सांगितले.