उच्च न्यायालयानं महाराष्ट्र बोर्डाचे इयत्ता 10 वी आणि 12 वीचे निकाल 10 जूनपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. परंतू 12 वीच्या उत्तरपत्रिकांचं काम अद्याप पूर्ण न झाल्यानं हे निकाल उशिराला जाहीर केले जातील असे संकेत महाराष्ट्र शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. जुलै महिन्यापर्यंत सर्व प्रकिया पूर्ण करून निकाल जाहीर केले जातील अशी माहिती मिळाली आहे.