शिंदे-ठाकरे वादावर 29 ऑगस्टला सुनावणी

शुक्रवार, 26 ऑगस्ट 2022 (09:47 IST)
महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय पेचावर आणि सत्तासंघर्षावर 29 ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.
काल 25 ऑगस्ट रोजी यावर सुनावणी होईल असे वाटले होते मात्र हा खटला पटलावर आलाच नाही.
आज सरन्यायाधीश एन. व्ही. रमण्णा निवृत्त होत आहेत. त्यानंतर नवे सरन्यायाधीश उदय लळीत यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी होईल.

सर्वोच्च न्यायालयात मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी 8 प्रश्न तयार केले होते, ज्याच्या आधारे घटनापीठ शिवसेना कोणाची आहे, याचा निर्णय घेईल. सुनावणी पूर्ण होईपर्यंत सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला निर्णय न घेण्यास सांगितले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती