मुसळधार पावसात भीमाशंकरला ट्रेकिंग करताना बेपत्ता झालेले 6 तरूण बचावले

सोमवार, 11 जुलै 2022 (18:00 IST)
रायगड जिल्ह्यात खांडूस भागातून सह्याद्रीच्या डोंगरमार्गे भीमाशंकर ट्रेक साठी तरुणांचा गट निघाला होता. अति मुसळधार पाऊस आणि घनदाट जंगल आंणि धुक्यामुळे हा गट मार्ग चुकला.आणि हे ट्रेकर्स अडकून पडले. स्थानिकांच्या मदतीने घोडेगाव पोलिसांनी तात्काळ रेस्क्यू ऑपरेशन हाती डोंगराळ भाग असल्याने त्याचे स्थान निश्चित होऊ शकले नाही. मात्र, काही वेळाने त्यांच्या मोबाईलवर संपर्क झाला. त्याचा शोध सुरू होता.त्यांना 11 तासाच्या शोधकाऱ्यानंतर सुखरूप बचावले.
 
मिळालेल्या माहितीनंतर उल्हासनगर मध्ये राहणाऱ्या तरुणाचा 6 जणांचा गट मुरबाड ते भीमाशंकर मार्गे ट्रेकिंगसाठी गेले होते. अति मुसळधार पाऊस आणि घनदाट धुक्यात आणि अंधारात ते रास्ता चुकले. या घटनेची माहिती मिळतात घोडेगाव स्थानिक पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीने त्यांना शोधण्याचे कार्य सुरु केले आणि 11 तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्यांना सुखरूप आणण्यात यश  मिळाले. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती