ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार

रविवार, 31 जुलै 2022 (14:27 IST)
उस्मानाबाद- गावात स्मशान भूमी नसल्याने संतप्त नातेवाईकानी चक्क ग्रामपंचायतीसमोरच अंत्यसंस्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
 
घडले असे की मालु लिंगा दुधभाते यांचे वृद्धपकाळाने वयाच्या 80 वर्षी निधन झाले. पण गावातील समशानभूमीचा वाद हा वर्ष 2016 पासून सुरू आहे तो अद्याप मिटलेला नाही. येथे प्रत्येकी वेळी पोलीस संरक्षण घेऊन अंत्यविधी केला जात होता. यावेळी मात्र अंत्यविधी स्मशानभूमीतच करू द्या, ही भूमिका नातेवाईक यांनी घेतली. पण यावर कोणताही तोडगा निघाला नाही त्यामुळे संतापलेल्या नातेवाईकांनी गावातील ग्रामपंचायत कार्यालया समोर अंत्यविधी उरकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती