फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीस तयार- नवाब मलिक

मंगळवार, 9 नोव्हेंबर 2021 (16:04 IST)
1993 बॉम्बस्फोटमधील आरोपी सोबत राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक यांनी जमीनीचा व्यवहार केल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या संबंधीत पुरावे शरद पवारांना देणार असल्याचेही फडणवीस म्हणाले आहेत. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. या फडणवीसांच्या आरोपांना नवाब मलिक यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
 
देवेंद्र फडणवीसांचे अंडरवर्ल्डशी संबध असल्याचा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला. उद्या मी 10 वाजता याबाबत खुलासा करणार असल्याचा इशारा मलिक यांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे. तसेच फडणवीसांनी कोणत्याही यंत्रणेकडे जावं, चौकशीस तयार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती