फडणवीस म्हणाले, आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय

शुक्रवार, 19 ऑगस्ट 2022 (20:35 IST)
मुंबईत  भाजप नेते प्रकाश सुर्वे यांच्या मागाठाणे येथे आयोजित दहीहंडी उत्सवात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी भाषणातून तुफान फटकेबाजी केली.
यावेळी फडणवीसांनी गोविंदा पथकांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न करत गोविंदांना खेळाडू असे संबोधले. तसेच खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, असे त्यांनी नमूद केले.
 
यावेळी फडणवीस पुढे म्हणाले की, आता आपले सरकार असून आपले सरकार आल्यानंतर दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा केला जातोय. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव उत्साहात साजरा होतोय, एकनाथ शिंदेंनी सांगितले की, आता गोविंदा हे खेळाडू असतील. दहीहंडी आता साहसी खेळ आहे. या खेळाडूंना सर्व सुविधा आता गोविंदांना दिल्या जातील, जखमी खेळाडूंच्या पाठीशी सरकार आहे, त्यामुळे आता कसं वाटतंय, मोकळं मोकळं वाटतंय. छान छान वाटतंय, असं मिश्किल भाषण त्यांनी दिले. तसेच पुन्हा त्यांनी मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आपण फोडू आणि विकासाच्या हंडीतून शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम करु असही म्हटले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती