“एकनाथ शिंदे राजीनामा देणार नाहीत. तेच मुख्यमंत्री राहतील. पुढची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच होईल. आमचे सरकार स्थिर आहे, असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल उद्या येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी हा विश्वास व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले कि, आम्ही आशावादी आहोत. कारण आमची केस मजबूत आहे. त्यामुळे योग्य निकाल येईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. अर्थात निकाल येईपर्यंत आपलाल्याला थांबलं पाहिजे. त्या करीत खूप त्याच्यावर स्पेक्युलिकेशन करणे योग्य नाही. सुप्रीम कोर्ट हे अपेक्स कोर्ट आहे. त्यांच्या निकालाकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. त्याच्यावर कुठलाही अंदाज व्यक्त करणे योग्य नाही असे देखील त्यांनी सांगितले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालपूर्वी एकनाथ शिंदे राजीनामा देतील, अशी चर्चा असल्याचे त्यांना विचारले असता त्यावर ते म्हणाले कि “माफ करा, पण शब्द वापरतो. हा मूर्खांचा बाजार आहे. यापेक्षा मी जास्त काही बोलू शकणार नाही. एकनाथ शिंदे का राजीनामा देतील? काय चूक केलीय त्यांनी, एकनाथ शिंदे राजीनामा देणारा नाहीत.