रिअल इस्टेट समूह मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपवर ईडीची कारवाई, 52 कोटींची मालमत्ता जप्त

शनिवार, 11 मे 2024 (19:28 IST)
रिअल इस्टेट समूह मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपच्या विरोधात नोंदवलेल्या मनी लाँड्रिंग प्रकरणासंदर्भात अंमलबजावणी संचालनालयाने नवी मुंबईतील 52.73 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे.
 
मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपने आपल्या अनेक प्रकल्पांसाठी खरेदीदारांना आमंत्रित केले होते आणि एका शीर्ष बॉलीवूड अभिनेत्रीला ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्त केले होते.

मोनार्क युनिव्हर्सल ग्रुपच्या प्रकल्पांची जाहिरात करणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या जाहिराती पाहिल्यानंतर अनेक गुंतवणूकदारांनी त्यांच्या तक्रारींमध्ये नमूद केले आहे की त्यांनी कंपनीच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणूक केली आहे. बांधकाम व्यावसायिक गोपाल अमरलाल ठाकूर यांनी गुंतवणूकदारांकडून जमा केलेली मोठी रक्कम त्याच्या विविध संलग्न कंपन्यांना हस्तांतरित केल्याचे ईडीच्या तपासात समोर आले आहे.
 
बिल्डर गटाने फ्लॅट खरेदीदारांकडून पैसे घेऊन नोंदणी करून घेतली नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे तक्रारीच्या आधारे महाराष्ट्र पोलिसांनी बिल्डर कंपनी आणि तिच्या संचालकावर गंभीर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी ईडी चौकशी करत आहे. 

ईडीच्या म्हणण्यानुसार, मोनार्क ग्रुप आणि त्याच्या संचालकांनी एकच फ्लॅट अनेक जणांना विकला आणि ग्राहकांच्या माहितीशिवाय आधीच विकलेले फ्लॅट गहाण ठेऊन NBFC कडून कर्ज घेतले. या प्रकरणात गोपाल अमरलाल ठाकूरला जुलै 2021 मध्ये अटक केली. ते सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी ऑगस्ट 2021 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. 

Edited by - Priya Dixit
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती