ऑनलाईन शिक्षणात दिवाळीची सुट्टी देणार

बुधवार, 4 नोव्हेंबर 2020 (10:19 IST)
राज्यातील सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणात दिवाळीची सुट्टी देणार असून त्या संबंधीचा निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे. अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. दरवर्षी प्रमाणे विद्यार्थी आणि शिक्षकांना घरी राहून दिवाळीचा साजरी करता येणार आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या दिवसात तरी ऑनलाईन शिक्षणापासून सुट्टी मिळणार आहे. 
 
१५ जून पासून राज्यातील शाळा बंद आहेत. त्यामुळे यावर्षीचे शैक्षणिक वर्षे ऑनलाईन शिक्षण पद्धतीने सुरू झाले. तेव्हा पासून विद्यार्थी शिक्षक तसेच पालक ही या या अध्ययन आणि अध्यापनाच्या प्रक्रियेत पूर्णपणे सहभागी झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही विद्यार्थी आणि शिक्षकांना दिवाळ सणाची सुट्टी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दिवाळीच्या काळात कोणत्याही परिक्षांचे नियोजन करू नका असं शिक्षण विभागाकडून सांगण्यात आलं आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती