विविध राशींच्या बायका फराळाला घरी बोलावल्यावर कसे स्वागत करतात ते बघा

मंगळवार, 3 नोव्हेंबर 2020 (10:27 IST)
मेष
समोर डिश ठेवून घ्या ...एवढेच म्हणणार....आग्रह वगैरे नाहीच. गप्प बसून राहणार.....येणा-याला कुठून आलो असे होते.

वृषभ
यांची त-हाच वेगळी....डिश पुढे ठेवून इतका आग्रह करतील की पाहुण्याची वृश्चिकेची फटकळ पत्नी म्हणते....."अहो खातो आम्ही आमच्या हाताने भरवू नका."
 
मिथून
कुठल्याच बाबतीत सिरियसनेस नाही. "अय्या खरंच आलात की तुम्ही", आता आमची चकली खाऊनच जा. तुटली तर तुम्ही जिंकलात."ह्याह्याह्या....
 
कर्क
कायम धास्तावलेल्या बरं का!! या वेळेस मोतीचूर लाडू घरी बनवलेले नाहीत. समोरच्या दुकानातून आणलेत. तूप चांगलं वापरत नाही म्हणे....पण आम्ही खाल्ले"....घ्या ना....
 
सिंह
मला अनारसे बनवता येत नाहीत. ते मागू नका....आणि मुलाला बोलावले नसताना घेऊन आलाय. सांभाळा त्याला....

कन्या
इतका वेळ डिश पुसत बसणार की मेषेचा पाहुणा स्वतःच्या खिशातल्या रूमालाने डिश पुसून फराळ वाढून घेतो.
 
तूळ
ताजं द्यायला हवं हे इतकं डोक्यात बसलेलं असत की पाहुणे आल्यावर लाडु वळायला घेतात.
 
वुश्चिक
मुलुखमैदान तोफ...पाहुण्यांसमोरच नव-याला ओरडणार.. "सक्काळपासून 5 बेसनलाडू हादडून झालेत. आता यांच्याबरोबर अजून एक कसला घेताय?"
 
धनू
मला नेहमी काहीतरी हटके आवडतं म्हणून रूटीन फराळाचं न देता मस्त फोडणीची पोळी देते. "
बिचारा कर्केचा पाहुणा निमूटपणे ते अन्नब्रह्म गिळतो.
 
मकर
आता महागाई इतकी झालीय....त्यात यांना बोनस ही नाही मिळाला. उगा तुम्हाला बोलावलेय म्हणून केलं सगळे "पाहुणा बघत राहतो.
 
कुंभ
दिवाळी दरवर्षीच येते पण आयुष्याचा भरवसा नाही. पुढच्या वर्षी तुम्ही असाल नसाल म्हणून आत्ता बोलावलेय."
 
मीन
अहो तुम्हाला बोलावलेय हे विसरले...."ए चिंटू समोरच्या मिठाईवाल्याकडून आण सगळे पाव पाव किलो हे काही जास्त खात नाहीत"

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती