वर्षाकाठी एकूण १२० कोटींची उलाढाल असलेल्या गोकुळ दूध संघाचा संचालक म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे आणि मानाचे पद समजले जाते. या पदासाठी तेवढ्यात ताकदच्या व्यक्तीची वर्णी लागते. बयाजी शेळके यांच्या रुपाने कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेला एक सर्वसामान्य घरातील कार्यकर्ता गोकुळच्या संचालक पदापर्यंत गेला आहे.
गोकुळ निवडणुकीसाठी रविवारी झाले होते मतदान : गोकुळसाठी रविवारी चुरशीने 99.78 टक्के इतके झाले होते. गोकुळ निवडणुकीच्या निमित्ताने कोल्हापूरचे पालकमंत्री-काँग्रेस नेते सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार-भाजप नेते धनंजय महाडिक यांचे गट पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.