धनंजय मुंडे यांचं जेसीबीतून फुलांची उधळण करून जोरदार स्वागत

बुधवार, 27 जानेवारी 2021 (07:30 IST)
बलात्काराच्या आरोपानंतर तक्रारदार महिलेकडून तक्रार मागे घेतल्यानंतर पहिल्यांदाच बीड जिल्ह्यामध्ये दाखल झालेल्या मंत्री धनंजय मुंडे यांचं कार्यकर्त्यांनी जेसीबीच्या द्वारे फुलांची उधळण करून केलं गेलं. शिरूर कासार याठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी थेट जेसीबीमधून धनंजय मुंडे यांच्यावर फुलांची उधळण केली गेली. यावेळी धनंजय मुंडे आपल्यावरील कार्यकर्त्यांचं आणि समर्थकांचा प्रेम पाहून भावूक झाले.
 
कोरोनामुळे आठ महिन्यांच्या दीर्घ कालावधीनंतर जनतेशी मनमोकळा संवाद साधत असून त्यामुळे भावूक झाल्याचे ते यावेळी म्हणाले. एखाद्याला भगवंताचा प्रसाद असतो, तसे तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत. कठीण प्रसंगामध्ये आपण सर्वांनी साथ दिली, आशीर्वाद दिला. मी शब्दात आभार मानू शकत नाही. असे यावेळी बोलताना धनंजय मुंडे म्हणाले. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती