देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात, म्हणे आम्ही भ्रष्टाचार रोखला धनंजय मुंढे यांची टीका

गुरूवार, 24 जानेवारी 2019 (10:58 IST)
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निर्धार परिवर्तनाचा या यात्रेला जालन्यातील जिंतूर येथे चांगला प्रतिसाद मिळाला. संपूर्ण देश भ्रष्टाचाराच्या विळख्यात अडकला आहे, तरी पंतप्रधान मोदी देशात भ्रष्टाचार नसल्याचा दावा करतायत. भाजपा सरकारने जनतेला कर्जमाफी, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५ लाख, २ कोटी रोजगार अशी एकापेक्षा एक फसवी आश्वासने दिली, पण ती पूर्ण केली नाहीत. मंत्रिमंडळात शेतकरी नसल्यामुळेच कर्जमाफी होत नाही, अशी जोरदार टीका या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.
 
जेष्ठ नेते छगन भुजबळ  यांनीही सरकारच्या कारभारावर जोरदार टीकास्त्र सोडले. ना घर बसा हमारा, ना बसने देंगे तुम्हारा, असा मोदी आणि योगींचा नारा आहे. २०१४ साली सरकारला राम मंदिर आठवले नाही. मात्र सत्ता डळमळीत झाल्यामुळेच राम मंदिरचा विषय परत काढण्यात आलाय. इव्हिएम मशीनमध्ये घोटाळा केल्याची माहिती गोपीनाथ मुंडे यांना समजली. त्यामुळेच त्यांची हत्या झाल्याची माहितीही आता समोर आली आहे. इतके सगळे करूनही मोदींना पाच राज्यांत पराभवच पत्करावा लागला, याकडेही भुजबळ यांनी लक्ष वेधले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती